ठाणे – नितीन कंपनी ते कोरम मॉलकडे जाणाऱ्या सर्व्हीस रस्त्यावर वाहतूकीत बदल…

ठाणे – ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नितीन कंपनी ते कोरम मॉल सर्व्हिस रस्त्यावरील संभाजीनगर जवळील कल्व्हर्ट बांधण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरात वाहतुकीची कोंडी होऊ नये व परिसरातील वाहतूक सुरळीत व सुनिश्चित राहण्यासाठी कोरम मॉल कडून नितीन जंक्शनकडे येणाऱ्या वाहनांना नितीन जंक्शनकडून सर्व्हिस रोडने कोरम मॉलकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आले असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.
वाहतुकीत बदल पुढील प्रमाणे आहे...
प्रवेश बंद – कोरम मॉलकडून नितीन जंक्शनकडे येणाऱ्या वाहनांना तारांगण वसाहतीच्या गेटजवळ प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – सदरची वाहने कोरम मॉल ते कॅडबरी जंक्शनकडे जाणाऱ्या सर्व्हीस रोडने किंवा स्लीप रोडने कॅडबरी ब्रिजखालून उजवे वळण घेवून इच्छीत स्थळी जातील.
प्रवेश बंद – नितीन जंक्शनकडून सर्व्हीस रोडने कोरम मॉलकडे जाणाऱ्या वाहनांना नितीन कंपनी येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – सदरची वाहने नितीन ब्रिज स्लीप रोडने पुढे कोरम मॉल कट येथून डावे वळण घेवून इच्छीत स्थळी जातील. तसेच संभाजीनगर परिसरात राहणाऱ्या रहिवासी यांना प्रवेश राहणार आहे.
ही वाहतूक अधिसूचना दि.11 जानेवारी 2023 रोजी पासून (3 महिन्यांकरीता कल्व्हर्टचे) काम संपेपर्यंत अमलात राहील, असे ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी कळविले आहे.