गांजा विक्रीसाठी आलेले चौघे अटकेत…

ठाणे – गांजा विक्रीसाठी आलेल्या चौघांना गुन्हे शाखा घटक १, ठाणे पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून गांजासह एकूण १७,९८,७६० /- रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. १) सोमेश राजेंद्र जयस्वाल २) दिपेश किशोर जयस्वाल ३) संदीप साहेबराव पावरा ४) दिपक संजय जयस्वाल अशी या चौघांची नावे आहेत.
याबाबत वृत्त असे आहे कि, रेतीबंदर रोड, कळवा, ठाणे येथे २ इसम गांजा हा अंमली पदार्थ विक्रीकरीता येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून सोमेश राजेंद्र जयस्वाल आणि दिपेश किशोर जयस्वाल या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे १५.५८८ ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ मिळून आल्याने सदरबाबत कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानंतर त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांचे आणखी २ साथीदार असून त्यातील एकजण कारमधून आला असून तो आजूबाजूला असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याप्रमाणे त्याचा तपास करून त्यांच्या एक साथीदार संदीप साहेबराव पावरा यास खारेगांव टोल नाक्यावरून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांचा दुसरा साथीदार दिपक संजय जयस्वाल यास नाशिक महामार्ग पोलिसांच्या मदतीने पिंपळगांव, जि. नाशिक येथून ताब्यात घेतले.
अशा प्रकारे पोलिसांनी ४ जणांना अटक करून त्यांच्याकडून १ कार, १५.५८८ किलोग्रॅम वजनाचा गांजा, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण १७,९८, ७६० /- रु. किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.