ठाणे

मोबाईल नंबरचा डाटा चोरी करून विकणाऱ्या २ पोलिसांसह एकास अटक…

thane – मोबाईल नंबरचा डाटा (C.D.R./S.D.R./Location) चोरी करून विकणाऱ्या दोन पोलिसांसह एका खाजगी इसमास गुन्हे शाखा घटक १ पोलिसांनी अटक केली आहे. आकाश सुर्वे आणि हर्षद परब अशी या दोघांची नावे असून, त्यांना सेवेतून बडतर्फ देखील करण्यात आले आहे.

दोघेही सायबर पोलीस स्टेशन, ठाणे शहर येथे कार्यरत होते. तसेच मोहम्मद सोहेल मोहम्मद शब्बीर राजपुत असे अटक करण्यात आलेल्या खाजगी इसमाचे नाव आहे.

मिळालेल्या गोपनीय माहितीवरून, आकाश सुर्वे आणि हर्षद परब हे दोघे स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता ते लोकसेवक म्हणून करत असलेल्या कर्तव्याचा गैरवापर करून मोबाईल नंबरचा डाटा (C.D.R./S.D.R./Location) चोरून तो डाटा मोहम्मद सोहेल राजपुत या सराईत गुन्हेगारास विक्री करत असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर प्रकरणाची पोलीस आयुक्त, ठाणे यांनी गांभिर्याने दखल घेऊन दोघांनाही सेवेतून ‘बडतर्फ’ करण्यात आले.

तसेच सायबर पोलीस ठाण्यात गु. रजि.क्र. ३/२०२५, भा.न्या.सं. कलम ३०३ (२), ३१४, ३१६ (५) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ४६, ६६, ७२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आणि तिघांना अटक करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page