ठाणे
उल्हासनगर येथील ज्वेलर्स दुकानातील चोरी प्रकरणी तिघांना अटक…
उल्हासनगर – विजयलक्ष्मी ज्वेलर्स दुकानातील चोरी प्रकरणी ठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता शोध पथकाने तिघांना अटक केली. माधव चुन्नालाल गिरी, दिनेश उर्फ सागर चंद्र रावल, दिपक रामसिंग भंडारी अशी या तिघांची नावे आहेत.
विजयलक्ष्मी ज्वेलर्समध्ये घरफोडी करून तब्बल ३ कोटी २० लाख किंमतीचे ६ किलो सोन्याचे दागिने चोरी करून नेले असल्याबाबत उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्याअनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे लखनौ, बनारस, नेपाळ – भारत सीमावर्ती भागात शोध घेऊन सदर तिघांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून ५५० ग्रॅम वजनाचे ३३ लाख रु किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.