डोंबिवलीत वाहतूक पोलिसांकरीता व्याख्यान संपन्न…
डोंबिवली – कल्याण वाहतूक विभागातील वाहतूक पोलिसांकरीता व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
रस्त्यावर वाहतूक नियमन करताना पोलिसांना येणारा मानसिक ताण, नागरिकांशी सौजन्याने वागण्यासाठी स्वतःमध्ये संयम असणे कसे आवश्यक आहे यासाठी रोटरी क्लब सनसिटी व डोंबिवली वाहतूक उप विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शुभम हॉल, डोंबिवली पूर्व येथे कल्याण वाहतूक विभागातील वाहतूक पोलिसांकरिता ‘वाहतूक पोलीसांना येणारा मानसिक ताण तणाव आणि त्यावरील उपाययोजना’ या विषयावर प्रसिद्ध मनोविकार तज्ञ डॉ.अद्वैत पाध्ये यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
यावेळी कल्याण वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मंदार धर्माधिकारी, कल्याण वाहतूक उपविभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश बने, डोंबिवली वाहतूक उपविभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते तसेच कल्याण, डोंबिवली व कोळसेवाडी वाहतूक उपविभागाचे अधिकारी, अंमलदार व वॉर्डन उपस्थित होते.