ठाणे

लाच घेताना सहाय्यक पोलीस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात…

ठाणे – ३५ हजार रुपयांची लाच घेताना मुंब्रा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश लाहीगुडे यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले.

याबाबत वृत्त असे आहे कि, तक्रादार यांच्याविरूध्द भादवि ३७६ व आयटी ऍक्ट प्रमाणे कारवाई न करण्यासाठी रमेश लाहीगुडे यांनी तक्रारदार यांच्याकडून ८०,००० /- रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी केली असता, रमेश लाहीगुडे यांनी तक्रारदार यांच्याकडे तडजोडीअंती ३५,००० /- रु. लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले, दरम्यान, एसीबी ठाणे युनिटने सापळा कारवाईत रमेश लाहीगुडे यांना तक्रारदार यांच्याकडून ३५,०००/- रु. लाचेची रक्कम घेताना रंगेहात पकडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page