चैन स्नॅचींग करणाऱ्यास कोनगाव पोलिसांनी केली अटक…

ठाणे – चैन स्नॅचींग करणाऱ्या एका इसमास कोनगाव पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून गुन्हयातील जबरी चोरी केलेले ८ ग्रॅम सोन्याच्या मंगळसुत्राचा तुकडा (किंमत ३५,००० /- रुपये) असा मुददेमाल हस्तगत केला.
याबाबत वृत्त असे आहे कि, फिर्यादी रोहिणी राणे आणि त्यांची सुन भिवंडी बायपास येथून रिक्षाने कल्याण येथे जात असताना प्रविण लॉज समोर, भिवंडी कल्याण रोड. रांजणोली, भिवंडी येथे रिक्षा चालकाने पाणी बॉटल घेण्यासाठी रिक्षा थांबिवली असता त्यांच्या रिक्षाच्या डाव्या बाजुने सदर अटक इसम आणि पाहिजे आरोपी असे मोटार सायकल वरून येऊन त्यावरील पाठीमागे बसलेल्या इसमाने फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरीने खेचत असताना फिर्यादी यांनी त्यांचे मंगळसूत्र पकडले असता त्या मंगळसुत्रापैकी आर्धवट मंगळसूत्र जबरीने खेचुन घेऊन कल्याण दिशेने पळून गेले असल्याबाबत दिलेल्या फिर्यादीवरून कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून आरोपीस अटक करून त्याच्याकडून गुन्हयातील जबरी चोरी केलेले ८ ग्रॅम सोन्याच्या मंगळसुत्राचा तुकडा (किंमत ३५,००० /- रुपये) असा मुददेमाल हस्तगत केला.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त परीमंडळ -२ भिवंडी नवनाथ ढवळे, सपोआ किशोर खैरनार, पूर्व प्रादेशीक विभाग भिवंडी, तसेच वरिष्ठ पोलीस रीक्षक राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सपोनि विनोद कडलग, पो.उप निरी सुर्यवंशी, पो. हवा ३६७७ मोरे, पो.हवा शिंदे, पो. हवा पवार, पो. हवा घोडसरे, पो. ना पाटील, पो.ना चोरगे, पो.ना गोरे, पोना महाले, पो. शि ढवळे व पो.कॉ पाटील यांनी केली. दरम्यान, वरिष्ठाचे मार्गदर्शनाखाली सदर गुन्हयाचा अधिक तपास सपोनि विनोद कडलग हे करत आहेत.