देश
मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेसचे नवे अध्यक्ष…

नवी दिल्ली – काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. शशी थरूर आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात झालेल्या लढतीत मल्लिकार्जुन खर्गे विजयी झाले आहेत. त्यामुळे तब्बल २४ वर्षानंतर काँग्रेस पक्षाला गांधी घराण्याबाहेरचे व्यक्ती अध्यक्षपदी मिळाले आहेत.
अध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीत मल्लिकार्जून खरगे यांना ७८९७ एवढी मतं मिळाली तर शशी थरूर यांना १०७२ मतं मिळाली. त्यामुळे काँग्रेसच्या निडणूक समितीने मल्लिकार्जुन खर्गे यांना विजयी घोषित केले.