महाराष्ट्र
भास्कर जाधवांच्या घरावर दगडफेक…

चिपळूण – ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर अज्ञाताकडून दगडफेक करण्यात आली आहे. जाधव यांच्या घराच्या बाहेर पेट्रोलच्या बॉटल आणि स्टम्प सुद्धा आढळून आल्या आहेत.
भास्कर जाधव यांच्या चिपळूण येथील घरावर मध्यरात्री अज्ञात इसमांनी दगडफेक केली. अज्ञात व्यक्तींनी घरावर दगड, स्टंम्प आणि बाटल्या फेकून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.