ठाणे
कल्याण – ट्रेलरची दोन रिक्षांना धडक..

कल्याण – कल्याणच्या पत्री पुलावर एका ट्रेलरने दोन रिक्षांना जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातामध्ये रिक्षातील ३ प्रवासी जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार सळई घेऊन जाणाऱ्या एका ट्रेलरमध्ये अचानक बिघाड झाला. ट्रेलर चालक यूटर्न घेत असताना त्याने समोरुन येणाऱ्या दोन रिक्षांना धडक दिली. या धडकेमध्ये रिक्षांचे मोठे नुकसान झाले. या अपघातात रिक्षा मधील ३ प्रवासी जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सदर प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी ट्रेलर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.