ठाणे
पाळीव श्वानाला बेदम मारहाण; ठाण्यातील घटना…

ठाणे – पेट क्लिनिकमध्ये एका पाळीव श्वानाला क्लिनिक मधील दोन कर्मचाऱ्यांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेनंतर मानपाडा पोलिसांनी मारहाण करणाऱ्या कर्मचाऱ्याला अटक केली असून पेट क्लिनिक बंद केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घोडबंदर रोडवरील कासारवडवलीजवळ हे पेट क्लिनिक आहे. याठिकाणी एका पाळीव श्वानाला उपचारासाठी आणले होते. त्यावेळी तेथील कर्मचाऱ्यांनी या श्वानाला लाथा बुक्क्याने मारले.
दरम्यान, या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच प्राणिमित्रांनी ताबडतोब पोलिसांशी संपर्क साधला त्यानंतर श्वानाला मारहाण करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आणि सदर क्लिनिक बंद केले.