kalyan

कल्याणमध्ये सापडली पिशवीत गुंडाळलेली नवजात मुलगी…

kalyan – कल्याण पूर्वेला एका पिशवीत गुंडाळलेली सात दिवसांची नवजात मुलगी सापडली असल्याची घटना उघडकीस आली आहे. माहितीनुसार, कल्याण पूर्वेकडे असलेल्या कोळसेवाडी चिकणीपाड्यातील श्री.विठ्ठल मंदिराबाहेर असलेल्या एका झाडाखाली पडलेल्या पिशवीत हि नवजात मुलगी आढळून आली.

एका महिलेला कचरा टाकायला जात असताना हि पिशवी आढळून आली, त्यावेळी काही भटके कुत्रे या पिशवीभोवती होते. पिशवीतून आवाज ऐकू येत असल्याने या महिलेने तात्काळ पिशवी उघडून पाहिली असता त्यात नवजात मुलगी आढळून आली. पूजा दाभेकर असे या महिलेचे नाव असून, तिने या मुलीला वाचवले आणि आपल्या घरी आणले. त्यानंतर याबाबत कोळसेवाडी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी या मुलीला ताब्यात घेऊन केडीएमसीच्या रूक्मिणीबाई रूग्णालयात दाखल केले.

दरम्यान, घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page