डोंबिवली
dombivali : घर बांधण्याच्या वादातून शेजारच्याची हत्या…

dombivali – घर बांधण्याच्या वादातून शेजाऱ्यानेच शेजाऱ्याची हत्या केली असल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीतील खंबाळपाडा, कांचन गाव येथे घडली. प्रताप चौधरी असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे तर रोहित शेलार हत्या करणाऱ्याचे नाव असून, तो फरार झाला आहे.

माहितीनुसार, चौधरी आणि शेलार या दोन कुटुंबांमध्ये घराच्या बांधकामावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. मंगळवारी हा वाद विकोपाला गेला आणि रोहित शेलार याने प्रताप चौधरी याच्यावर शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात प्रतापचा जागीच मृत्यू झाला. हे पाहून मारेकरी रोहित शेलार याने घटनास्थळावरून पळ काढला.
या घटनेची माहिती मिळताच टिळकनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आणि गुन्ह्याचा पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.


