पेट्रोल,डिझेलचे दर पुन्हा वाढले…

mumbai – पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. पेट्रोलच्या दरात 2.61 रुपयांनी आणि डिझेलच्या दरात 2.17 रुपयांनी वाढ झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत डिझेलचा दर 95.20 रुपये प्रति लिटर आणि पेट्रोलचा दर 102.12 रुपये प्रति लिटर झाला आहे. तर मुंबईत पेट्रोल 2.76 रूपये वाढले असून मुंबईत पेट्रोल 111.21 रूपये प्रति लीटर, तर डीझेल 2. 81 रूपयांनी वाढून 97.83 रूपये प्रति लीटर इतके झाले आहे. कोलकाता, चेन्नईसह इंधनाचे दर वाढले आहेत.

गेल्या 10 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झालेली ही चौथी दरवाढ आहे.
पेट्रोलचे नवे दर (प्रति लीटर)
मुंबई 111.21 रुपये (+2.72 वाढ)
कोलकाता 113.51 रुपये (+2.87वाढ)
चेन्नई 107.77 रुपये (+2.46 वाढ)
दिल्ली 102.12 रुपये (+2.61वाढ)
डिझेलचे नवे दर (प्रति लीटर)
कोलकाता 99.82 रुपये (+2.80 वाढ)
चेन्नई 99.55 रुपये (+2.57 वाढ)
मुंबई 97.83 रुपये (+2.81 वाढ)
दिल्ली 95.20 रुपये (+2.71 वाढ)



