ठाण्यात 8.24 कोटींचा अंमली पदार्थांचा मुद्देमाल जप्त…

thane – तरुण पिढीमध्ये वाढत्या अंमली पदार्थांच्या वापरावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय नार्को को-ऑर्डिनेशन सेंटर (N-CORD) समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या 18 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या बैठकीत दिलेल्या सूचनांनुसार विविध विभागांनी केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी आज निवासी जिल्हाधिकारी डॉ. संदिप माने यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस पोलीस आयुक्त कार्यालय, मिरा-भाईंदर, नवी मुंबई, ऑद्यौगिक सुरक्षा कार्यालय, कल्यण, ठाणे, जिल्हा आरोग्य कार्यालय, ठाणे, जिल्हा शिक्षण विभाग, ठाणे (प्राथमिक व माध्यमिक), शिक्षण अधिकारी, ठाणे, नवी मुंबई, मिरा-भाईंदर व कल्याण महानगरपालिका, जिल्हा समाजकल्याण कार्यालय, ठाणे, जिल्हा कृषि अधिक्षक, ठाणे, उपवन संरक्षक कार्यालय, ठाणे, सह. आयुक्त केंद्रीय व सेवा कर विभाग ठाणे, उपविभागीय दंडाधिकारी भिवंडी, अन्न व औषध प्रशासन विभाग, ठाणे, जिल्हा शैल्यचिकित्सक ठाणे, जिल्हा माहिती कार्यालय ठाणे, सहायक अधिक्षक टपाल विभाग, ठाणे, नशा मुक्ती मंडळ महाराष्ट्र राज्य अशा विविध विभागातील अधिकारी व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

ठाणे शहरात माहे नोव्हेंबर 2025 मध्ये एकूण रु. 8 कोटी 24 लाख 49 हजार 670 चा अंमली पदार्थांचा मुद्देमाल जप्तकरुन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या या प्रभावी कारवाईबद्दल निवासी जिल्हाधिकारी संदीप माने यांनी सर्व प्रशासकीय यंत्रणांचे अभिनंदन केले. माहे नोव्हेंबर 2025 मध्ये मिरा-भाईंदर मध्ये 29 लाख 17हजार 780, नवी मुंबईत 1 कोटी 51 लाख 50 हजार 600 किंमतीच्या अंमली पदार्थांचा मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये कोकेन, गांजा, चरस, एमडीए पावडर, मोफोड्रॉन, कफ सीरफ बॉटल्स, नशेच्या गोळया अशा अंमली पदार्थांचा समावेश आहे.
ठाणे पोलीस दलाकडून नोव्हेंबर 2025 मध्ये ठाणे शहर, मिरा-भाईंदर, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई या भागातील विविध ठिकाणी असलेले 48 गोडाऊन, 52 कंपन्या, 20 व्यसनमुक्ती केंद्रे, 83 फार्म हाऊस, 70 रासायनिक कारखाने, 112 बंद पडलेल्या कंपन्यांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत.
आपल्या परिसरात निदर्शनात येत असलेल्या अंमली पदार्थांच्या गैरव्यवहाराबद्दल नागरिकांनी 1933 या हेल्पलाईन क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदिप माने यांनी केली आहे.
या बैठकीत जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीचे अध्यक्षांकडून तयार करण्यात आलेल्या विशेष गट 1. राज्य उत्पादन शुल्क विभाग, ठाणे 2. अन्न व औषध प्रशासन, ठाणे 3. कृषी अधीक्षक, ठाणे यांच्यामार्फत जिल्हयातील रासायनिक कंपन्या बंद अहेत की सुरु आहेत यांची तपासणी कल्या बाबतचा आढावा घेण्यात आला. उपस्थित सर्व सदस्यांकडून अंमली पदार्थांबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्यात आला. यावेळी जिल्हयातील व्यसनमुक्ती केंद्रांच्या तपासणीचा आढावा घेण्यात आला.
जिल्हयात कोरेक्स, बटण, तसेच इतर अंमली औषधी यांची अवैधरित्या विक्री करणाऱ्या मेडीकल विरुध्द सह आयुक्त (अन्न व औषधे), ठाणे यांनी केलेल्या कारवाईचा आढावा घेण्यात आला. टपाल विभागाने जिल्हयात येणाऱ्या परदेशी कुरीअर व वारंवार एकाच पत्त्यावर येणाऱ्या परदेशी कुरीअर बद्दल माहिती सादर करण्याच्या सुचना निवासी जिल्हाधिकारी संदीप माने यांनी यावेळी दिल्या. कृषी अधिक्षक यांनी जिल्हयात माहे नोव्हेंबर 2025 पर्यंत कुठेही गांजा किंवा खसखस यांची लागवड करण्यात आलेली नसल्याबाबत अहवाल सादर केला.
अंमली पदार्थ विषयी जनजागृती बाबत कराण्यात आलेल्या कार्यवाही/कार्यक्रमांची माहिती समिती समोर सादर केली. वन विभागाच्या अखत्यारित येत असलेल्या क्षेत्रावर विशेष लक्ष ठेऊन केलेल्या कार्यवाही बाबतची माहिती समिती समोर सादर करण्याबाबतच्या सुचना यावेळी देण्यात आल्या. समाज माध्यमे, प्रिंट मिडिया, डिजीटल मिडियाचा व्यापक प्रमाणात वापर करुन व्यसनमुक्ती विषयी जनजागृती करण्याच्या सुचना यावेळी निवासी जिल्हाधिकारी संदीप माने यांनी दिल्या. ही आढावा बैठक विविध विभागांमधील समन्वय अधिक बळकट करून अंमली पदार्थविरोधी मोहिमेस नवीन गती देणारी ठरली.



