महाराष्ट्र
विधानसभेत नगर विकास, पाणी पुरवठा व गृहनिर्माण विभागाच्या पुरवणी मागण्या मान्य…

nagpur – विधानसभेत नगरविकास, पाणी पुरवठा व गृहनिर्माण विभागाच्या सन 2025-26 च्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या.
पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत पुरवणी मागण्या मांडल्या.
विधानसभेत नगरविकास विभागाच्या सन 2025-26 या वर्षाच्या एकूण 9 हजार 195 कोटी 76 लाख 58 हजार रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या.
पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या 196 कोटी 57 लाख 17 हजार रुपयांच्या मागण्याना मंजुरी देण्यात आली.
गृहनिर्माण विभागाच्या 91.9 कोटींच्या मागण्या यावेळी मंजूर करण्यात आल्या. पुरवणी मागण्याच्या चर्चेत विधानसभेतील विविध सदस्य सहभागी झाले होते.

