नवी दिल्ली
न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी घेतली सरन्यायाधीश पदाची शपथ…

new delhi – न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी आज सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली आहे. ते भारताचे ५३ वे सरन्यायाधीश बनले आहेत. दिल्लीत राष्ट्रपती भवन येथे आयोजित शपथविधी सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सूर्य कांत यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
शपथविधी सोहळ्याला उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभेचे सभापती ओम बिरला, तसेच केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य उपस्थित होते.
दरम्यान. न्यायमूर्ती सूर्यकांत संवैधानिक, आणि दिवाणी कायदेक्षेत्रातले तज्ज्ञ असून २०१९ पासून ते सर्वोच्च न्यायालयात न्यायदान करत आहेत. सरन्यायाधीशपदाचा त्यांचा कार्यकाळ १५ महिन्यांचा असेल.



