महाराष्ट्र
महिला अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात…

नाशिक – पगार काढून देण्याच्या मोबदल्यात १० हजार रुपयांची लाच घेताना महिला जिल्हा हिवताप अधिकारी यांच्यासह २ आरोग्य सेवकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांनी रंगेहात पकडले. वैशाली दगडू पाटील, संजय रामू राव आणि कैलास गंगाधर शिंदे अशी या तिघांची नावे आहेत.
याबाबत वृत्त असे आहे कि, तक्रारदार हे आजारी असल्याने ते वैद्यकीय रजेवरून हजर झाले त्यानंतर त्यांचा पगार काढून देण्याच्या मोबदल्यात जिल्हा हिवताप अधिकारी, वैशाली पाटील यांनी १०,०००/- रु. लाचेची मागणी केली. वैशाली पाटील यांच्यासह आरोग्य सेवक संजय राव यांचाही यात सहभाग होता. त्यांनी कैलास गंगाधर शिंदे यांना लाच घेण्यास सांगितले असता, शिंदे यांना १०,०००/- रु. लाचेची रक्कम घेताना एसीबीने रंगेहात पकडले.