दागिन्यांची बॅग घेऊन पसार झालेल्या रिक्षा चालकास अटक…

dombivali – महिला प्रवाशाची सोन्याचे दागिने असलेली बॅग घेऊन पसार झालेल्या रिक्षा चालकास कल्याण गुन्हे शाखा, घटक ३ पोलिसांनी अटक करून, चोरीला गेलेला सर्व ऐवज हस्तगत केला आहे.
एक महिला ३ तोळे सोन्याचे मंगळसूत्र असलेली बॅग आणि त्यासोबत आणखी एक बॅग अशा दोन बॅगा रिक्षातच विसरली होती. परंतु रिक्षाचालकाने प्रामाणिकपणा न दाखवता ती लांबवली. जयेश गौतम असे अटक करण्यात आलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे.
याबाबत वृत्त असे आहे कि, बालीका गवस या दिवाळी सणानिमित्त कल्याण-शिळ महामार्गावरील टाटा पॉवर येथे राहणाऱ्या आणि डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा रोडवरील स्टार कॉलनीतील राहणाऱ्या अशा दोन्ही मुलींकडे आल्या होत्या. त्या स्टार कॉलनीतील मुलीला भेटून टाटा पॉवर येथील दुसऱ्या मुलीकडे जाण्यासाठी रिक्षाने निघाल्या होत्या. त्यावेळी प्रवासादरम्यान त्यांनी आपले ३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र बॅगेत ठेवले होते.
बालीका गवस या पिसवलीतील पिंगारा बारसमोर रिक्षातून उतरल्या आणि रिक्षावाल्याला भाडे देऊन मुलीची वाट बघत थांबल्या. काही वेळाने त्यांच्या लक्षात आले कि, आपल्या २ बॅगा आपण रिक्षातच विसरलो आहे. तोपर्यंत रिक्षावाला पसार झाला होता. बालीका गवस यांनी तातडीने मुलीला सर्व प्रकार सांगितला. दोघींनी रिक्षावाल्याचा शोध घेतला, परंतु तो कुठेही सापडला नाही. अखेर बालीका गवस आणि त्यांचे जावई योगेश सावंत यांनी याबाबत कल्याण गुन्हे शाखा, घटक ३ पोलिसांकडे तक्रार केली.
त्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे जयेश गौतम या रिक्षाचालकाला शोधून काढले. आणि त्याच्याकडून चोरीला गेलेला सर्व ऐवज हस्तगत केला.
जयेश गौतम याच्याकडून चोरीस गेलेले ३ लाख ६० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा एकूण ५ लाख २१ हजार ५५० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, रिक्षाचालकाला पुढील कारवाईसाठी मानपाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची यशस्वी कामगिरी आशुतोष डुंबरे पोलीस आयुक्त ठाणे शहर, पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे व शेखर बागडे, सहा. पोलीस आयुक्त, (शोध-१) गुन्हे ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे, सपोनि सर्जेराव पाटील, सपोनि/बळवंत भराडे, पोउपनि/किरण भिसे, पोउपनि/विनोद पाटील, सपोउनि दत्ताराम भोसले, बालाजी शिंदे, अदिक जाधव, सुधीर कदम, सचिन भालेराव, पांडुरंग भांगरे, सचिन कदम, विजय जिरे, विलास कडु, गोरखनाथ पोटे, प्रंशात वानखेडे, उल्हास खंडारे, दिपक महाजन, प्रविण किनरे, गुरुनाथ जरग, विनोद चन्ने, मिथुन राठोड, गोरक्ष शेकडे, सतिश सोनवणे, गणेश हरणे, जालिंदर साळुंखे, मंगल गावित, चालक अमोल बोरकर यांनी केली आहे.



