मध्य रेल्वेवर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू…

mumbai – मध्य रेल्वे मार्गावर मोठा अपघात झाला आहे. लोकलने ४ प्रवाशांना उडवलं असल्याची माहिती समोर आली आहे. यात ३ प्रवाशांचा जागीच मृत्यू आणि एकजण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हि घटना सँडहर्स्ट रोड स्टेशनवर घडली काही प्रवासी रुळावरून चालत होते. त्यावेळी अंबरनाथ फास्ट लोकलने रेल्वे रुळावरून चालणाऱ्या प्रवाशांना उडवलं, यात तिघांचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला.
मुंब्रा इथे झालेल्या अपघातात लोहमार्ग पोलिसांनी २ अभियंत्यांवर गुन्हे दाखल केले, त्याच्या विरोधात रेल्वे कर्मचारी संघटना छत्रपती शिवाची महाराज टर्मिनस, मुंबई येथे संध्याकाळच्या सुमारास आंदोलन करत होते. आणि याचा फटका प्रवाशांना बसला. आंदोलनामुळे मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे.
दरम्यान, लोकल नसल्यामुळे जवळपास सर्वच स्थानकांवर गर्दी वाढली. सँडहर्स्ट रोड स्टेशनवर ४ प्रवासी पायी चालत होते. त्यावेळी अचानक लोकल आली आणि या प्रवाशांना घडक दिली. या अपघातात ३ जणांचा मृत्यू तर एकजण जखमी झाला.



