डोंबिवलीत स्टॉल लावण्यावरून महिलांमध्ये जोरदार राडा…

dombivali – डोंबिवलीत दिवाळीचा स्टॉल लावण्यावरून महिलांमध्ये जोरदार राडा झाला असल्याची माहिती समोर आली आहे. हि घटना डोंबिवली पश्चिमेतील घनश्याम गुप्ते रोडवर घडली असून, परप्रांतीय फेरीवाल्या महिला आणि मराठी महिलांमध्ये हा राडा झाला. परप्रांतीय फेरीवाल्या महिलांनी मराठी महिलांशी वाद घातला तसेच स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून घेऊन भर रस्त्यात जोरदार तमाशा केला.
मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळीचा स्टॉल लावण्यावरून परप्रांतीय फेरीवाला महिला आणि श्री वल्ली फाउंडेशनच्या मराठी महिला यांच्यात वादावादी झाली. श्री वल्ली फाउंडेशला दिवाळी निमित्त स्टॉल लावण्यास महापालिकेकडून परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार स्टॉलसाठी मंडप टाकण्यासाठी या महिला आल्या असत्या, त्याठिकाणी असलेल्या फेरीवाल्या महिला जागेवरून हटण्यास मनाई केली. तसेच या महिलांनी मराठी महिलांशी वाद घातला. आणि स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून घेऊन भर रस्त्यात जोरदार तमाशा केला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच केडीएमसी आणि विष्णू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.