केडीएमसी ‘ह’ प्रभागातील वरिष्ठ लिपिक नंदकिशोर राणे निलंबित…

dombivali – कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ‘ह’ प्रभागातील मालमत्ता कर आकारणी विभागातील वरिष्ठ लिपिक नंदकिशोर राणे यांना आयुक्त अभिनव गोयल यांनी तडकाफडकी निलंबित केले असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव येथील माणकोली उड्डाण पुलाजवळील स्वामी नारायण लाईफस्पेस व्यापारी संकुल असलेल्या भागाला राणे यांनी दोन वर्ष कर आकारणी केलीच नाही. त्यामुळे पालिकेचा लाखो रूपयांचा महसूल बुडाला.
स्वामी नारायण लाईफस्पेस संकुलातील अ, ब, क आणि ड विंगला पालिकेच्या नगररचना विभागाने बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिला आहे. या संकुलातील ड विभागातील अनिवासी भागाला मागील दोन वर्षाच्या कालावधीत नंदकिशोर राणे यांनी कर आकारणी केली नव्हती. त्यामुळे पालिकेचे लाखो रूपयांचे नुकसान होत होते.
अभिनव गोयल यांनी ह प्रभाग कार्यालयातील मालमत्ता कर विभागातील कर वसुलीचा आढावा घेतला. त्यावेळी हि बाब त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी नंदकिशोर राणे यांना तडकाफडकी निलंबित केले.