kalyan

स्मार्ट सिटी कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात खुलेआम वेश्या व्यवसाय सुरु…

स्मार्ट सिटी कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात खुलेआम, राजरोसपणे मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय सुरु आहे. रेल्वे तिकीट काउंटरच्या बाहेर अनेक महिला उभ्या असतात. अश्लील हावभाव करत असतात. त्याचा नाहक त्रास येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना होत आहे. कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर दररोज २० ते २५ महिला उभ्या असतात. आणि ग्राहकांना आकर्षित करण्याकरता अश्लील हातवारे करणे असे नको ते प्रकार करत असतात. त्यामुळे तेथून येणाऱ्या- जाणाऱ्या महिला,लहान मुलं, वृद्ध प्रवासींना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याठिकाणी खुलेआम वेश्या व्यवसाय होत असल्याने विशेषतः प्रवासी महिलांना त्या परिसरातून भीतीच्या सावटाखाली वावरावे लागत आहे. रेल्वे स्टेशन परिसरात छेडछाड, विनयभंग, अपहरण, बलात्कार, चोरी असे गुन्हे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात नीलम हॉटेल, अनिल पॅलेस, कल्याण एनएक्स, किंग हॉटेल, कल्याण गेस्ट हाऊस या हॉटेलच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरच जवळजवळ २० ते २५ महिला उभ्या असतात. या महिला रात्री ८ वाजल्या पासून ते पहाटे ४ -५ पर्यंत तेथे उभ्या असतात आणि वेश्या व्यवसाय करत असतात. तरीही पोलीस प्रशासन कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. काही दिवसांपूर्वीच कल्याण पश्चिमेतील अवंतरा या स्पा च्या नावाखाली चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी कारवाई केली. मग कल्याण स्टेशन परिसरात उघडपणे राजरोसपणे असा वेश्या व्यवसाय होत असताना पोलीस डोळेझाक का करत आहेत? कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात स्थानिक पोलीस जेव्हा गस्त घालता तेव्हा या वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला पोलिसांना दिसत नाहीत का? असे नागरिकांचे म्हणणे आहे.

कल्याण स्टेशन परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. हे सर्व प्रकार या कॅमेऱ्यात कैद होत आहेत. तरीही या वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांवर कारवाई करण्यात दिरंगाई का होत आहे? वारंवार या वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची तक्रार सोशल मिडियाच्या माध्यमातून स्थानिक पोलिसांकडे करण्यात येते. मग पोलीस तात्पुरती कारवाई करतात आणि नंतर परिस्थतीती जैसे थे च राहते. पुन्हा तितक्याच जोमाने या महिला कोणालाही न घाबरता कल्याण रेल्वे परिसरात वेश्या व्यवसाय खुलेआम करतात. त्यामुळे पोलीस नेमकी काय कारवाई करतात? त्याची माहिती तक्रारदारांना देतात का? यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

खरंतर पोलिसांनी अशा वेश्या व्यवसायावर निर्बंध घालणे गरजेचे आहे. या वेश्यावृत्तीला कुठेही खतपाणी मिळता कामा नये. काही वेळेला वेश्या व्यवसायाला उत्तेजन देणाऱ्या दलालांच्या मागे काही पडद्यामागून काम करणाऱ्या बड्या लोकांचा समावेश असतो. हे सर्व पोलीस यंत्रणेने तपासून घ्यायला हवे. कारण ह्या वेश्याव्यवसायाची साखळी खूप मोठी असते, वरवर पाहता ती साखळी कुणाला दिसून येत नाही. अनेकदा दलाल पोलिसांना सहजपणे सापडतात पण त्यांच्या मागचे सूत्रधार कुणी वेगळेच असतात. त्याचा कसून शोध पोलिसांनी घेतला पाहिजे. पोलीस यंत्रणेच्या दुर्लक्षपणामुळे अशा वेश्या व्यवसायाचे प्रमाण वाढत जाताना दिसत आहे. कोणत्याही वेश्याव्यवसायाला सरकारने कायदेशीर परवानगी दिलेली नाही. कायद्याने अशा गोष्टीवर कायम निर्बंध घातलेले आहेत, त्याची काटेकोर अंमलबजावणी पोलिसांनी केली पाहिजे. परंतु याची अंलबजावणी कल्याण रेल्वे परिसरात होताना दिसत नाही. पोलीस कारवाईचा दिखावा करत असल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे याची दखल राज्याचे गृहमंत्री आणि ठाणे पोलीस आयुक्तांनी घ्यावी आणि या वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांवर कायमसावरूपी कारवाई करून वेश्याव्यवसाय बंद करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page