डोंबिवलीत २.१२ कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त…

dombivali – डोंबिवली पूर्वेतून एका परदेशी नागरिकाकडून मानपाडा पोलिसांनी २.१२ कोटी रुपयांचे एम.डी.(मेफेड्रोन) अंमली पदार्थ जप्त करून त्याला अटक केली आहे. इसा बनायोका असे याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी इसा बनायोका यास निळजे गाव परिसरातून अटक करून त्याच्याकडून एकूण १.५१ किलो मेफेड्रॉन (एम.डी.) २.१२ कोटी रुपयांचे जप्त केले. तसेच त्याच्याविरुद्ध मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्ह्याचा पुढील तपास सुरु आहे.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त, आशुतोष डुंबरे, पोलीस सह आयुक्त, ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, संजय जाधव, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३ कल्याण अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त डोंबिवली विभाग सुहास हेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिपान शिंदे, पोलीस निरीक्षक (प्रशासन) दत्तात्रय गुंड, सपोनि/सागर चव्हाण, सपोनि अजय कुंभार, पोहवा/पाटील, माळी, राठोड, पोशि आडे, गरूड, पोशि/ झांझुर्णे, पोशि/चौधर यांनी केली आहे.