साधूच्या वेशात हातचलाखीने सोन्याची चैन चोरणाऱ्यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या…

dombivali – साधूच्या वेशात येऊन हातचलाखीने सोन्याची चैन चोरणाऱ्या तिघांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. राहुल घालनाथ भाटी उर्फ मदारी, आशिष दिलीपनाथ मदारी, लखन आबा निकम अशी या तिघांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरलेली चैन आणि कार असा मुद्देमाल हस्तगत केला.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे वेटलॅन्ड पार्क जवळ, खोणी पलावा, डोंबिवली पुर्व येथून त्यांच्या घरी जात असताना तीन अनोळखी इसमांनी कारमधून येऊन त्यांच्यापैकी एकजण साधूच्या वेषेत होता. या तिघांनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून फिर्यादीच्या गळयातील १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन व १० ग्रॅम वजनाची अंगठी हातचलाखीने घेतली असल्याबाबत मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर तिघांना अटक करून त्यांच्याकडून १ लाख २० हजार रूपये किंमतीची १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन व गुन्हा करण्यासाठी वापरलेली कार असा मुद्देमाल हस्तगत केला.
दरम्यान, गुन्ह्याचा पुढील तपास मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सचिन साळवी करत आहेत.

सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, संजय जाधव, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३ कल्याण अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त डोंबिवली विभाग सुहास हेमाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) राम चोपडे, पोलीस निरीक्षक (प्रशासन) दत्तात्रय गुंड, पोलीस निरीक्षक (का.व सु) जयपाल गिरासे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश राळेभात, संपत्त फडोळ, सागर चव्हाण, पोलीस हवालदार/ राजेंद्रकुमार खिलारे, सचिन साळवी, सुनिल पवार, शिरीष पाटील, संजु मासाळ, विकास माळी, सुशांत पाटील, पोलीस नाईक / गणेश भोईर, कृष्णा बोराडे, यल्लपा पाटील, पोलीस शिपाई/घनश्याम ठाकुर, गणेश बडे, नाना चव्हाण, विजय आव्हाड, अशोक आहेर, सोपान शेळके, योगेश आडे यांनी केली आहे.