चेन स्नॅचिंग करणारा गजाआड; ५ लाखांचा मुद्देमाल जप्त…

dombivali – चेन स्नॅचिंग करणाऱ्या एका सराईत गुन्हेगारास डोंबिवली राम नगर पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून ५.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. परेश किशोर घावरी असे याचे नाव आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून कल्याण डोंबिवली परिसरात अशा घटनांमध्ये वाढ झाली होती. महिलांना लक्ष करून, मोटारसायकलवर येणारे दोघे चेन खेचून पळून जात होते. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले होते. त्याअनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे परेश घावरी याला अटक केली. आणि त्याच्याकडून २० ग्रॅम आणि १० ग्रॅम सोन्याची चेन, मोटारसायकल, स्कूटर असा एकूण ५.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

दरम्यान, डोंबिवली, कल्याण परिसरात मॉर्निंग वॉकला आलेल्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने खेचून पळणाऱ्या चेन स्नॅचिंग टोळीतील हा मुख्य आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे.

सदरची यशस्वी कामगिरी राम नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि बळवंत भराडे, पोउनि प्रसाद चव्हाण, पोहवा सुनिल भणगे, मंगेश शिर्के, प्रशांत सरनाईक, शिवाजी राठोड, नितीन सांगळे, निलेश पाटील, देविदास पोटे, राजेंद्र सोनवणे आणि ज्ञानेश्वर शिंदे यांनी केली आहे.