मुंबईत १७ वर्षीय मुलाची हत्या…

मुंबई – एका १७ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
याप्रकरणी आर सी एफ पोलीसांनी शफी उर्फ शफिक शेख याला अटक केली आहे आणि त्याच्या घरातून मृतदेहाचे तुकडे हस्तगत केले आहेत. ईश्वर मारवाडी असे मृत मुलाचे नाव असून शफी हा त्याच्या मानलेल्या बहिणीचा पती आहे. मानलेली बहीण असूनही ईश्वर पत्नी आणि मेहुणीची छेड काढत असल्याच्या संशयातून शफीने ही हत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत वृत्त असे आहे कि, ईश्वर हा फिर्यादी यांचा मानलेला मुलगा असून त्याचे आईवडील नसल्याने तो ८ वर्षाचा असल्यापासून फिर्यादी हे त्यांचा सांभाळ करीत आहे. आणि शफी उर्फ शफीक अब्दुल माजिद शेख हा फिर्यादी यांचा जावई असून तो ईश्वरवर आपल्या पत्नीची छेडछाड करीत असल्याचा संशय घेत होता त्यावरून शफीने ईश्वरची हत्या केली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तपास करून शफी उर्फ शफिक शेख याला अटक केली.