बनावट फोन पे चा वापर करून फसवणूक करणारे दोघे जेरबंद…

kalyan – बनावट फोन पे चा वापर करून एका किराणा दुकानदाराची फसवणूक करणाऱ्या दोघांना कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. पंकज पाटील आणि अनिल कांबळे अशी या दोघांची नावे आहेत. सदर प्रकरणी पोलिसांनी त्यांच्याकडून १६,४५५/- रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत वृत्त असे आहे कि, तिसंगाव नाका येथील आर. के. बझार या सुपर मार्केटमध्ये दोन इसमांनी ६२९३/ – रू. किंमतीचे सामान विकत घेतले आणि त्यानंतर फिर्यादी यांच्या भावाला ऑनलाईन बिल भरतो असे सांगून सदरचे बिल अदा केलेबाबतचे बनावट फोन पे ऍपवर दाखवून बिल न भरता फिर्यादी यांची फसवणूक केली असल्याबाबत कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे पंकज पाटील आणि अनिल कांबळे या दोघांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून किराणा माल, वस्तू, चार मोबाईल असा एकूण ६,४५५/- रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस उप आयुक्त, परीमंडळ ३, कल्याण अतुल झेंडे, व सहा. पोलीस आयुक्त कल्याण विभाग कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वपोनिरी. गणेश न्हायदे, पो.निरी प्रशासन नाईक यांच्या सुचनेप्रमाणे सहा. पो निरी दर्शन पाटील, पोलीस उप निरीक्षक सिराज शेख, पोहवा बोरसे, पोहवा सांगळे, पोहवा कापडी, पोहवा जरग, पोहवा सांगळे, पोशि सोनावळे, पोशि गिते यांनी केली आहे.