कर्नाटकात महाराष्ट्राच्या एसटीवर हल्ला…

karnataka – कर्नाटकमध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसवर हल्ला करत काळे फासल्याची घटना घडली आहे. पुणे- बेंगलोर महामार्गावरील चित्रदुर्ग इथे हा प्रकार घडला असून, कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार केल्याचे समोर आले आहे . या कार्यकर्त्यांनी एसटीला काळं फासलं. तसेच चालकाला मारहाण देखील केली.

मिळालेल्या माहितीनुसार, कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी एसटी महामंडळाच्या बसला काळं फासलं. त्यानंतर एसटी चालकाला कन्नड येतं का? असं विचारात मारहाण केली आणि त्यानंतर त्याच्या चेहऱ्याला काळ देखील फासलं.
दरम्यान, या घटनेनंतर महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये जाणारी एसटी वाहतूक तात्पुरती थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच घटनेच्या निषेधार्थ कोल्हापुरात उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाच्यावतीने जोरदार निदर्शने करण्यात येत आहे. या प्रकारानंतर महाराष्ट्र-कर्नाटकमध्ये तणाव निर्माण झाला आहे.