मुंबईत कोळसा भट्टीवरील तंदुर रोटी बंद…

mumbai – हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाब्यांना आता तंदूर रोटी बनवण्यासाठी तंदूर कोळसा भट्टी वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्याऐवजी किचनमध्ये इलेक्ट्रिकल उपकरणं, सीएनजी, पीएनजी, एलपीजी इंधनाचा वापर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेने तंदूर कोळसा भट्टींवर बंदी घातली आहे. महापालिकेने सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि ढाब्यांना रितसर नोटीस पाठवत याबाबत आदेश दिले आहे.
सर्व बेकरी चालक, रेस्टॉरंट आणि धाबा चालकांनी कोळसा तंदूर भट्टीऐवजी सिएनजी, पीएनजी वापरावे. हॉटेल चालकांनी ८ जुलै पर्यंत कोळसा तंदूर भट्टी ऐवजी इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर न केल्यास मुंबई महापालिकेकडून कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही या नोटीसमधून देण्यात आला आहे.