कल्याण-शिळफाटा रोड ५ दिवस बंद राहणार…
dombivali – लोढा पलावा येथील एक्सपेरिया मॉल समोरील निळजे रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात येणार आहे. या कामासाठी कल्याण-शिळफाटा रोड ५ दिवसासाठी बंद ठेवण्यात येणार आहे अशी माहिती कोळसेवाडी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी युवा सुत्रशी बोलताना दिली.
हा रोड ५ फेब्रुवारी पासून रात्री १२ ते १० फेब्रुवारी रात्री १२ पर्यंत वाहतूकीसाठी बंद असणार आहे. ५ ते १० फेब्रुवारी या पाच दिवसांच्या कालावधीत पलावा जंक्शनकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
या कालावधीत पलावा जंक्शनकडे येणारी हलकी, मध्यम वाहनांची वाहतूक पर्यायी रस्ते मार्गाने वळविण्यात येणार आहे. अवजड वाहनांना हा रस्ता बंद असेल.
पर्यायी मार्ग खालील प्रमाणे…
१) ठाणे / मुंबई कडे जाणाऱ्या वाहनांसाठी कल्याण पश्चिम दुर्गाडी कोनगांव मार्गे नाशिक, मुंबई महामार्गाचा वापर करावा.
२) ठाणे / मुंबई कडे दुचाकी, तीनचाकी चारचाकी वाहने डोंबिवली पश्चिम मोटागांव रेतीबंदर खाडी उड्डाण पुल माणकोली नाशिक, मुंबई महामार्गाचा वापर करावा.
३) नवी मुंबई कडे जाणाऱ्या वाहनांसाठी पत्रीपुल नेतीवली चक्कीनाका श्री मलंगरोड मार्गे नेवाळी -बदलापुर पाईपलाईन रोड खोणी नाका, निसर्ग हॉटेल मार्गे तळोजा बायपास मार्गाचा वापर करावा.
४) नवी मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी कल्याण शिळ रोडने काटईनाका डावीकडे वळण घेवुन बदलापुर पाईपलाईन रोड खोणीनाका, निसर्ग हॉटेल मार्गे तळोजा बायपास मार्गाचा वापर करावा.
५) प्रवाशांनी वरील नमुद कालावधीत जास्तीत जास्त रेल्वे प्रवासाला प्राधान्य द्यावे.