३ वर्षाच्या मुलीचे अपहरण करणार्या महिलेस अटक…
mumbai – वरळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ३ वर्षाच्या मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिचे अपहरण करून पसार झालेल्या महिलेस वरळी पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक करून अपहृत मुलीची सुटका केली. दिपाली दास असे या महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वरळीतील प्रेमनगर परिसरात हि ३ वर्षाची मुलगी घराबाहेर खेळत होती. त्यावेळी चाॅकलेट देण्याच्या नावाखाली दिपालीने या मुलीचे अपहरण केले.
याबाबत मुलीच्या आईला समजले असता, तिने तात्काळ वरळी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्याअनुषंगाने पोलिसांनी शोध घेऊन तपास करून, अवघ्या काही तासात प्रेमनगर परिसरातूनच दिपाली दासला शोधून काढून तिच्याकडून अपहृत मुलीची सुटका करून तिला कुटुंबियांच्या स्वाधीन केले. तसेच याप्रकरणी दिपालीला अटक करण्यात आली आहे.