मुंबई
अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला…
mumbai – प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात सैफ जखमी झाला असून, त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री सैफच्या मुंबईतल्या राहत्या घरात घुसून एका अज्ञाताने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्याच्यावर ६ वार करण्यात आले.
दरम्यान, या घटनेचा मुंबई गुन्हे पोलीस शाखेकडून तपास सुरु आहे.