डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार…
dombivali – डोंबिवली पूर्वेत एका आठ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून, आरोपीला अटक केली आहे. वैभव सिंग असे याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दावडी परिसरात हि घटना घडली असून, सदर मुलगी याच परिसरात क्लासला जात होती आणि वैभव सिंगची बहीण हा क्लास घेत होती. १५ जानेवारीला हि मुलगी आणि तिची मैत्रीण वैभव सिंगच्या घरी क्लासला गेली असता, क्लास टीचर घरी नव्हती, वैभव सिंग घरी होता. त्याने या मुलीचा हात पकडून तिला बेडरूममध्ये घेऊन गेला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
दरम्यान, घटनेनंतर या मुलीने घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगितला. कुटुंबियांनी तात्काळ मानपाडा पोलीस ठाण्यात जाऊन वैभव सिंग विरुद्ध तक्रार दिली असता पोलिसांनी गुन्हा दाखल करून वैभव सिंगला अटक केली.