डोंबिवलीत हस्तिदंत विक्रीसाठी आलेले दोघे जेरबंद…

dombivali – डोंबिवलीत हस्तिदंत विक्रीसाठी आलेल्या दोघांना मानपाडा पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून दोन हस्तिदंत जप्त केले आहेत. आकाश पवार आणि नितीन धामणे अशी या दोघांची नावे आहेत.
मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एमआयडीसी परिसरात दोन जण हत्तीचे दात (हस्तीदंत) तस्करी करून विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी सदर ठिकणी सापळा रचून दोघांना अटक केली. आणि त्यांच्याकडून २ हस्तीदंत, १ मोटार स्कूटर, २ मोबाईल असा एकूण १०,६०,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला तसेच त्यांच्याविरूध्द मानपाडा पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची यशस्वी कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, संजय जाधव, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३ कल्याण अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त डोबिवली विभाग सुहास हेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राम चोपडे, पोलीस निरीक्षक (प्रशासन) दत्तात्रय गुंड, पोलीस निरीक्षक (का.व सु) जयपाल गिरासे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश राळेभात, संपत फडोळ, पोलीस हवालदार राजेंद्रकुमार खिलारे, सचिन साळवी, सुनिल पवार, शिरीष पाटील, संजु मासाळ, विकास माळी, पोलीस नाईक गणेश भोईर, कृष्णा बोराडे, यल्लापा पाटील, पोलीस शिपाई घनश्याम ठाकुर, अशोक आहेर, गणेश बडे व सोपान शेळके यांनी केली आहे.
दरम्यान, गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार सचिन साळवी करत आहेत.