kalyan
केडीएमसीच्या ट्रकच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू…

kalyan – कल्याणमध्ये केडीएमसीच्या ट्रकचा भीषण अपघात झाला असल्याची माहिती समोर आली असून, या अपघातात एका महिलेचा आणि तिच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेतील लाल चौकी परिसरात हि घटना घडली. हि महिला आपल्या मुलासह रस्ता ओलांडत असताना कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कचरा आणि माती वाहून नेणाऱ्या ट्रकच्या धडकेत या दोघांचा मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.