मुंबई
गेट वे ऑफ इंडियावरून एलिफंटाकडे जाणारी बोट उलटली…
मुंबई – गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटाला जाणारी एक प्रवासी फेरीबोट उलटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेट वे ऑफ इंडियाजवळून दोन बोटी एलिफंटाच्या दिशेने निघाल्या होत्या. या दोन बोटी पैकी नीलकमल नावाच्या बोटीला उरण कारंजा जवळ नौदलच्या बोटीने धडक दिली. त्यानंतर ही बोट उलटली.
या बोटीमध्ये ७५ ते ८० प्रवासी प्रवास करत होते. त्यातील काही जणांना बाहेर काढण्यात आले. तर यात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, ७ ते ८ प्रवाशी अजून बेपत्ता आहेत. नौदलाच्या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून बचावकार्य सुरु आहे.