ठाणे

दरोडा टाकणारी टोळी गजाआड…

thane – अग्निशस्त्रासह दरोडा टाकणाऱ्या टोळीस गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक करून २१,९७,६११ रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या टोळीत एका विधीसंघर्षित बालकाचा देखील समावेश आहे. मोहीत हिंदुजा, वरूण होटवानी, रोहन रेडकर उर्फ बाबु, स्वप्नील ससाणे उर्फ बाबुराव, अन्वर सुबानी शेख, निता विष्णु मनुजा उर्फ भक्ती अशी यांची नावे आहेत. ठाण्यातील कॅडबरी जंक्शन परिसरात या टोळीने एका कारवर दरोडा टाकला होता.

याबाबत वृत्त असे आहे कि, राबोडी पोलीस ठाणे हद्दीत एक महिला कॅब कारने मुबई येथे जात असताना या टोळीने या महिलेच्या कारचा पाठलाग करून, नाशिक मुंबई हायवे मुंबई लेनवरील कॅडबरी जंक्शनजवळील ब्रीजच्या चढणीवर सदर कार अडवून कॅब चालकाला धमकावून या महिलेच्या दोन बॅग ज्यामध्ये ५०,०००/- सौदी रियाल (भारतीय चलनातील ११,२९,०००/- रू.) व भारतीय चलनातील १ लाख रूपये असे एकूण १२ लाख २९ हजार रूपये जबरीने चोरून पळून गेले असल्याबाबत राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे या टोळीस अटक केली आणि त्यांच्याकडून दरोडा टाकून जबरी चोरी केलेली रक्कम, गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली कार, मोटारसायकल तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेले अग्निशस्त्र, गावठी कट्टा व १ जिवंत काडतूस मोबाईल असा एकूण २१,९७,६११/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.

सदरची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अपर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त अमरसिंह जाधव, सहा. पोलीस आयुक्त शोध १ (गुन्हे) तथा प्रभारी अधिकारी खंडणी विरोधी पथक शेखर बागडे, सहा.पोलीस आयुक्त शोध २ (गुन्हे) राजकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि / नरेंद्र पवार, सपोनिरी/सुनिल तारमळे, सपोनिरी/श्रीकृष्ण गोरे, सपोनिरी/ भुषण कापडणीस, पोउपनिरी/विजयकुमार राठोड, पोउनिरी/सुभाष तावडे,सपोउनि / संजय बाबर, सपोउनि / संदिप भोसले, पोहवा/दिपक गडगे, पोहवा/आशिष ठाकुर, पोहवा/संजय राठोड, पोहवा /सचिन शिंपी, पोहवा / योगीराज कानडे, पोहवा/अभिजीत गायकवाड, मपोहवा / शितल पावसकर,पोना/रविंद्र हासे, पोशि/अरविंद शेजवळ, पोशि/ तानाजी पाटील, पोशि/संतोष वायकर, मपोशि/मयुरी भोसले, चापोना/ भगवान हिवरे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page