राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा जाहीर…
pune – विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात बारामतीच्या प्रगतीसाठी विविध कामांचा समावेश करण्यात आला आहे. तसंच प्रत्येक मतदारसंघाचा सारांश असलेली पुस्तिका देखील त्यांनी प्रकाशित केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असलेल्या प्रत्येक विधानसभा मतदार संघात, मतदारसंघातल्या आवश्यकतेनुसार वेगळा जाहीरनामा जाहीर केला आहे.
याप्रसंगी बोलताना अजित पवार म्हणाले की, निवडणूकीत सहभागी होणाऱ्या सर्व पक्षांचे जाहीरनामे जाहीर होत आहेत. महायूतीचा जाहीरनामादेखील येणार आहे. पण त्यासोबतच एक पक्ष म्हणून आमचा जाहीरनामा आम्ही जाहीर केला आहे. आम्ही ज्या विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवत आहोत त्या प्रत्येक मतदारसंघाचा जाहीरनामादेखील आम्ही देत आहोत.
जाहीरमान्यातील महत्त्वाचे मुद्दे…
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात 45000 जोड रस्ते जोडण्याचे आश्वासन
लाडकी बहीण योजना 1500 रुपयांवरून 2100 रुपये करणार
10 लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी 10000 रुपये शिष्यवृत्ती देण्याचे आश्वासन
महिला सुरक्षेसाठी 25000 महिलांची पोलीस दलात भरती
धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 25 हजार रुपये देण्याचे आश्वासन
शेतकऱ्यांच्या पिकांच्या एमएसपीमध्ये 20 टक्के वाढ करणार
जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी करण्याचा प्रयत्न
वृद्धापकाळ निवृत्ती वेतन 1500 रुपयांवरून 2100 रुपये करणार
राज्यात 25 लाख रोजगार निर्माण करण्याचे प्रयत्न करणार
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन
वीज बिलात 30 टक्के कपात करण्याचे आश्वासन
सौरऊर्जेला प्राधान्य देण्याचे आश्वासन
अंगणवाडी आणि आशा सेविकांना 15,000 रुपये मासिक वेतन
प्रशिक्षणाद्वारे 10 लाख विद्यार्थ्यांना 10,000 रुपयांची मासिक शिष्यवृत्ती