उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत ५४ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त…
mumbai – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध पथकांनी ठाणे जिल्ह्यामध्ये मुंब्रा वळण रस्ता, येथे भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याची वाहतूक करीत असलेल्या वाहनावर आणि सहकार नगर, लिंक रोड, चेंबूर, मुंबई या ठिकाणी परराज्यात निर्मित असलेला भांग मिश्रीत पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर 26 ऑक्टोबर रोजी कारवाई केली.
यामध्ये चेंबूर येथील कारवाईत 5 व मुंब्रा येथील कारवाईमध्ये 2 अशा एकूण 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या दोन्ही कारवाईमध्ये एकूण 54 लाख 48 हजार 600 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या मुद्देमालापैकी चेंबूर येथे 35 लाख 73 हजार 400 व मुंब्रा येथे 18 लाख 75 हजार 200 रूपयांचा समावेश आहे.
या गुन्ह्यातील आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये जप्त केलेल्या साहित्यामध्ये 3 टेम्पो वाहने, 2232 किलो भांग मिश्रीत पदार्थ, परराज्यातील भारतीय बनावटीचे 120 बॉक्स विदेशी मद्य आदींचा समावेश आहे.