देश

न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची नवे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती…

new delhi – देशाचे नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचा कार्यकाळ येत्या १० नोव्हेंबरला पूर्ण होत असून, न्यायमूर्ती खन्ना येत्या ११ नोव्हेंबरपासून  सरन्यायाधीश पदाची सूत्रं स्वीकारतील.

विद्यमान सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्याशी चर्चा करून राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी हा निर्णय घेतल्याचं केंद्रीय कायदे मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी म्हटलं आहे.

५१ वे सरन्यायाधीश बनलेले संजीव खन्ना सध्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश आहेत. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यानंतर संजीव खन्ना हे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश आहेत. त्यांच्या काळात त्यांनी काही ऐतिहासिक व महत्त्वाचे निकाल घेतले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page