महाराष्ट्र
बजरंग सोनवणे यांचा शरद पवार गटात प्रवेश…

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडमधील मोठे नेते बजरंग सोनवणे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, बीड जिल्हाध्यक्ष संदीप क्षीरसागर, महेबूब शेख, उषा दराडे यांच्यासह शरद पवार गटाच्या महत्त्वाच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
दरम्यान, राष्ट्रवादीतील नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून बजरंग सोनवणे यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे, बीड जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे.