महाराष्ट्र
२ पिस्तुल, २५ राऊंड, १ चाकुसह दोघे जेरबंद…
ambernath – २ पिस्तुल, २५ राऊंड आणि एका चाकुसह दोघांना अंबरनाथ पोलिसांनी अटक केली आहे. दिग्विजय पिसाळ, नरेंद्र घरत अशी या दोघांची नावे आहेत.
याबाबत वृत्त असे आहे कि, कल्पेश पाटील, दिग्विजय पिसाळ आणि इतरांनी मिळून एका व्यक्तीस मारहाण करुन पिस्टल व तलवार सारखे हत्यारे दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याबाबत अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे जांभुळगाव वीट भट्टी या ठिकाणी छापा टाकून दिग्विजय पिसाळ आणि नरेंद्र घरत या दोघांना अटक करून त्यांच्याकडून २ देशी बनावटीचे पिस्तुल, २ जिवंत राऊंड, २३ राउंड चे अर्धवट पुढील भाग, १ चाकू आणि २ दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत केला.