ठाणे

भिवंडीत एमडी पावडरसह एकास अटक…

thane – भिवंडी परिसरात ६६ ग्रॅम वजनाची एम.डी. (मेफेड्रॉन) क्रिस्टल पावडरसह एकास भिवंडी गुन्हे शाखेने अटक केली आहे. उमरान इद्रीस खान असे याचे नाव आहे.

गुन्हे शाखा, घटक २, भिवंडी येथील पोलीस पथकास मिळालेल्या माहितीवरून, नाशिककडून  ठाण्याकडे  जाणाऱ्या सर्विस रोडवर, मानकोली, भिवंडी येथे पोलिसांनी सापळा रचून उमरान इद्रीस खान याला अटक केली. त्याच्याजवळ ६६ ग्रॅम वजनाची एम.डी. (मेफेड्रॉन) क्रिस्टल पावडर हा अंमली पदार्थ मिळून आला.

सदर प्रकरणी त्याच्याकडून एम.डी. (मेफेड्रॉन) क्रिस्टल पावडर, मोबाईल, रोख रक्कम असा एकूण २,१७,२५०/- रूपये किमंतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page