नवी दिल्ली
अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करण्यास केंद्राची मंजुरी…
new delhi – अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर करण्याच्या मागणीला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. ही मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत होती. राज्य सरकारने पाठवलेल्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. राज्याचे महसूल आणि पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे.
अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत होती. राज्य सरकारने पाठवलेल्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता अहमदनगर जिल्हा अहिल्यानगर नावाने ओळखला जाणार आहे.