kalyan

मोबाईल चोरणाऱ्यासह चोरीचे मोबाईल विकत घेणारे जेरबंद…

kalyan – मोबाईल चोरणाऱ्यासह चोरीचे मोबाईल विकत घेणाऱ्या तिघांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. फैयाज शेख, दिपक चंचलानी आणि कमल हरचंदानी अशी या तिघांची नावे असून, पोलिसांनी त्यांच्याकडून ८७,०००/- रुपये किंमतीचे मोबाईल हस्तगत केले आहेत.

याबाबत वृत्त असे आहे कि, सुमारे १ वर्षांपूर्वी फ्लिपकार्ट कंपनीच्या कार्यालयातून महागडे आयफोन चोरी गेले होते त्याबाबत बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याअनुषंगाने बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल अरुण आंधळे यांनी गुन्ह्याचा तांत्रिक व गोपनीय  माहितीच्या आधारे माहिती काढली असता, फैयाज शेख हा त्याच्याकडील चोरीचा मोबाईल घेऊन बैल बाजार सर्कल येथे येणार आहे अशी माहिती मिळाली. 

मिळालेल्या माहितीच्या आधारे DCP अतूल झेंडे, Sr.PI सुरेशसिंग गौड यांच्या मार्गदर्शनाखाली  API रूपवते, पो.हवा सचिन साळवी, पो.हवा परमेश्वर बाविस्कर, पो.हवा रवी भालेराव, पो.कॉ अरुण आंधळे, यांनी बैल बाजार येथे सापळा रचून फैयाज शेखला अटक करून त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने एकूण ४ मोबाईल फ्लिपकार्ट कार्यालयातून चोरून ते उल्हासनगर येथील दिपक चंचलानी आणि कमल हरचंदानी या मोबाईल शॉप व्यापारांना विकले असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे या व्यापारांना देखील पोलिसांनी अटक केली. 

याप्रकरणी पोलिसांनी एकूण ८७,०००/- रुपये किंमतीचे मोबाईल आरोपींकडून हस्तगत केले असून, आरोपींनी अजून काही मोबाईल चोरी केले आहेत का ? याचा तपास API नवनाथ रूपवते आणि डी बी पथक करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page