डोंबिवली
शिंदे गटाचे युवा सेना सचिव दिपेश म्हात्रेंचा ठाकरे गटात प्रवेश…
dombivali – डोंबिवलीतील शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना प्रदेश सचिव व माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे त्यांचे बंधू जयेश म्हात्रे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठं खिंडार पडलं आहे.
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते विनायक राऊत, सचिव वरुण सरदेसाई, उपनेते कल्याण संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत, माजी आमदार सुभाष भोईर तसेच कल्याण डोंबिवलीमधील इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.