महाराष्ट्र
इंदापूरात महाविद्यालयासमोर गोळीबार…
पुणे – इंदापूर तालुक्यात एका तरुणावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात तरुण गंभीर जखमी झाला आहे. राहुल चव्हाण असे जखमी झालेल्याचे नाव असून, दुचाकीवर आलेल्या अज्ञाताने इंदापूर महाविद्यालयाच्या समोर राहुलवर तब्बल ४ राऊंड फायर केले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दरम्यान, गोळीबाराची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमी राहुलला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.