रिक्षा चोरी करणारे दोघे अटकेत; ७ रिक्षा हस्तगत…

डोंबिवली – कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर परीसरात रिक्षा चोरी करणाऱ्या सराईत चोरटयांना मानापाडा पोलीसांनी अटक करून एकूण ७ रिक्षा हस्तगत केल्या. नासीर हुसेन पठाण आणि शाहरूख बुडन शहा अशी या दोघांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी टाटा नाका परिसरातून नासीर पठाण आणि त्याच्या साथिदार शाहरूख शहा याला अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी मानपाडा, बाजारपेठ, चौक व हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ऑटो रिक्षा चोरी केले असल्याचे सांगितले. सदर प्रकरणी पोलिसांनी त्यांच्याकडून ३,७०,०००/- रु किमतीच्या ७ ऑटो रिक्षा हस्तगत केल्या असून, त्यात ४ पोलीस ठाण्याचे ५ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
सदरची यशस्वी कामगिरी दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, कल्याण, सचिन गुंजाळ, उप आयुक्त, परीमंडळ ३, कल्याण, सुनिल कुराडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस स्टेशनचे वपोनि विजय कादबाने, पोनि (गुन्हे) राम चोपडे, पोनि दत्तात्रय गुंड, सपोनिरी. महेश राळेभात, सपोनिरी. प्रशांत आंधळे, सपोउपनि काटकर, पोहवा राजेंद्रकुमार खिलारे, पोहवा दिपक गडगे, पोहवा संजु मासाळ, पोहवा सोमनाथ ठिकेकर, पोहवा सुनिल पवार, पोहवा माळी, पोहवा निसार पिंजारी, पोना रविंद्र हासे, पोना यल्लपा पाटील, पोना महादेव पवार, पोना शांताराम कसबे, पोना गणेश भोईर, पोना प्रविण किनरे, पोना अनिल घुगे, पोना चिंतामण कातकडे, पोशि महेंद्र मंझा, पोशि अशोक आहेर, पोशि नाना चव्हाण यांनी केली