चार वर्षापासून फरार असलेला आरोपी जेरबंद…
कल्याण – चार वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. सैफ सिकंदर बुरहान असे याचे नाव असून, तो बाजारपेठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 86/2021 एन डी पी एस कायदा 1985 कलम 8 (क) 21( क ) व 29 (नार्कोटिक्स) या गुन्ह्यामध्ये मागील चार वर्षापासून पासून फरार होता.
सैफ सिकंदर बुरहान हा ए.पी.एम.सी. मार्केट कल्याण येथे येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार सचिन साळवी यांना मिळाली होती. त्यानुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून सैफ सिकंदर बुरहानला अटक केली.
सदरची यशस्वी कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड यांच्या मार्गदर्शनाखाली डिटेक्शन ब्रांच चे स.पो.निरीक्षक नवनाथ रूपवते, डिटेक्शन टीमचे सहा.पोउप निरीक्षक सुरेश पाटील, पो.हवा. सचिन साळवी, पो.हवा प्रेम बागुल, पो.शि अरुण आंधळे यांनी केली असून, गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.निरी नवनाथ रूपवते करीत आहेत.